कालचे भाळणे नको आता
चांदणे माळणे नको आता
मीच नाही म्हणून टाकावे
तू पुन्हा टाळणे नको आता
सत्य पचवायची मिळो ताकद
स्वप्न कवटाळणे नको आता
मागणे माग तू मनोभावे
देव खंगाळणे नको आता
फार झाली हयातभर कसरत
तोल सांभाळणे नको आता
घावही चालतील झालेले
व्यर्थ रेंगाळणे नको आता
..................................................
.

1 comment:
अतिशय सुंदर गझल. प्रत्येक शेर "क्या बात हैं" घेऊनच जातो.
Post a Comment