दोन गझला : धनाग्रज


 


१.


आखतात देशांना सीमा

घालतात लोकांना सीमा 


स्वच्छंदी वनचर बागडती 

कळते का प्राण्यांना सीमा?


भास्कर देतो प्रकाश आम्हा

का नसते किरणांना सीमा? 


जीवनदायी घनरस येई

माहित ना मेघांना सीमा 


सुखावती त्या श्रमल्या जीवा

ना समजे झुळकांना सीमा 


दान सुखाचे मिळो जगाला

नसाव्यात मनुजांना सीमा



२.


देश त्रिकाळ मनात रहावा

राष्ट्रविचार उरात रहावा 


पाझरतो अभिमान दिगंती

तोच प्रत्येक कणात रहावा


जो वसतो हृदयात सदाचा

तोच हरेक क्षणात रहावा


प्रेमळ मात्र मनात नसावा

सादर आचरणात रहावा 


देश भला व सुखात असावा 

मोद सदैव जनात रहावा 


बोल धनाग्रज अंतिम बोले

भारत प्राणपणात रहावा

.............................................

No comments: