माझे तुझ्या जगाशी नाते तुटून गेले
एका क्षणात जगणे माझे सरून गेले
झाला सराव आता दुःखास पाळण्याचा
हृदयात घाव दुखरे ओठी हसून गेले
होतो उभा किनारी स्वप्नांस घेउनी मी
लाटांसवे किनारे माझे सुटून गेले
द्यावे कसे कुणाला आश्वासने प्रितीची
माझेच सर्वकाही जेव्हा हरून गेले
सांगायची कुणाला अंतःकथा मनाची
माझेच शब्द जेव्हा मजला छळून गेले
माझ्या तुझ्या घराच्या कैदेतल्या कमानी
शेवट तुझा नि माझा धोके कळून गेले
गेला वसंत आणिक आला शिशीर जेंव्हा
पानासवेत सरसर मीही गळून गेले
.........................................................

No comments:
Post a Comment