दोन गझला : आश्रुबा कोठावळे

 



१


आभाळाला भांडू आता

पाऊस पाड सांगू आता


गाली हासून ती म्हणाली 

मनातले मी सांगू आता


आकाशाला गेल्या चीरा 

कोठे कोठे सांधू आता


सुख दुःखाच्या वाटेवरती 

आनंदाने नांदू आता 


सिमेंटच्या या जंगलामधे 

कोठे घरटे बांधू आता


२


वाळले रे रान आता पंढरीच्या पांडुरंगा

पाठवावे पावसाला पंढरीच्या पांडुरंगा


दुःख सारे झेलतो मी बारमाही जिंदगीचे

फक्त द्यावी साथ मजला पंढरीच्या पांडुरंगा


सर्व काही सोडले रे मी तुझ्या ते भरवशावर

दे जरासे ध्यान आता पंढरीच्या पांडुरंगा


संकटांना घाबरत नाही कितीही येउ दे मज

ठेव डोई हात आता पंढरीच्या पांडुरंगा 


मन कराया मोकळे रे येत आहे आशु आता

टेकवाया आज माथा पंढरीच्या पांडुरंगा

.................................................................


No comments: