१.
निर्माण होत आहे नुसतीच झुंडशाही
संकेत देत असते आडून बारमाही
निर्भीड खांब चौथा टिकवून ठेव भाऊ
दुबळी कशास करतो अपुलीच लोकशाही
पैशात मोजल्यावर झाला गुलाम समजा
सावर जरा खुबीने अपुली खुशाल बाही
हे शब्द चंदनाचे परखड भविष्यवाणी
वृतांत सत्यवादी देणार वाहवाही
देशास तारणारा ख्याती चहू दिशांनी
लोभास सोडल्यावर घडणार सर्व काही
या मोडक्या घराच्या ताटीस वाचवा हो
धर्मांध भोवऱ्याची देऊ नयेच ग्वाही
हातात लेखणीची ताकद बुलंद व्हावी
ऐटीत ठेव जनता संपव हुकूमशाही
२.
जो तीर काळजाला जखमी करून गेला.
सहवास भरजरी हा तेव्हा कळून गेला
सोडून पायरीला मी वागले परंतू;
तेंव्हा जमीर माझा पुरता मरून गेला.
जो तो दलाल दिसला मग आर्त हाक त्याला
संसर्ग वेदनेवर इतका डसून गेला
डोळ्यांत श्रावणाच्या आल्या भरून धारा
स्थितप्रज्ञ चेहऱ्याला लाटा वळून गेल्या
झक्कास टोलनाके वाटेत पाहिले पण
एकाच वादळाने जर तो उडून गेला
नक्षत्र आवडीचे न्हाणे तरूण झाले
सौदामिनी चमकली सगळा गढून गेला
लाचार शब्दवेणा मजला नकोच आहे
आवाज अंतरीचा आता विरून गेला
............................................................
No comments:
Post a Comment