गझल : राजेंद्र अत्रे





साऱ्या जगात माझा भारत महान आहे 

मी नागरीक त्याचा मज स्वाभिमान आहे 


जाती नि धर्म भाषा येथे जरी विविधता 

साऱ्यास गुंफण्याला पण संविधान आहे 


श्रीमंति अन् गरीबी जरि येथ वर्गवारी 

घटनेत माणसाला दर्जा समान आहे


नाना विचारधारा उठतात वादळेही 

माणूसकीस जपणे, त्याचे प्रमाण आहे  


आहेत पक्ष अगणित, घडते समाजकारण 

प्रगतीस रोध नाही, ती वेगवान आहे 


आहे खुले नभांगण घेण्या खगा भरारी 

होण्यास सिद्ध येथे पळण्यास रान आहे


दैदिप्यमान इथला इतिहास हा यशाचा 

आम्ही स्वतंत्र जरिही, स्वातंत्र्य प्राण आहे!

............................................................



No comments: