काही दिवसांपूर्वी मराठी गझलकारांमधे वसीम बरेलवीच्या या मत्ल्यावर बऱ्यापैकी चर्चा झालीः
'तू भी बिखरना सीख ले, अपने जिस्म की पागल ख़ुशबू से
मै भी हुआ जाता हू बाहर, अन्देशों के क़ाबू से'
एक तर 'खुशबू' आणि 'क़ाबू' मध्ये अलामतीचा प्रश्न तर आहेच. त्याहून जास्त मोठी समस्या म्हणजे नंतरच्या शेरांमधे - 'आँसू', 'बाज़ू', 'पहलू' असे काफिये घेतले आहेत; ज्यामध्ये मतल्याच्या काफियांमधला स्थिर अक्षर ( हर्फ-ए-रवी ) 'बू' पण सांभाळलेला नाही.
प्रथमदृष्ट्या तरी हे दोषपूर्णच वाटते. 'खुशबू' आणि 'काबू' मध्ये अलामत सांभाळलेली नाही. पण मग एवढ्या मोठ्या शायराने अशी चूक का केली असेल? असा प्रश्न पडला. हा प्रश्न भेडसावत असताना दाग़ दहेलवीच्या एका गझलेचा हा मत्ला माझ्या ध्यानात आलाः
'ख़ातिर से या लिहाज़ से मैं मान तो गया
झूटी क़सम से आप का ईमान तो गया'
या गझलेत पुढच्या शेरांमधे 'एहसान', 'कुर्बान', 'पहचान', 'जान' असे काफिये वापरले आहेत.
दाग़च्याच दुसऱ्या एका गझलेचा मत्लाः
'आफत की शोख़ियां है तुम्हारी निगाह में
मेहशर के फितने खेलते हैं जल्वा-गाह में'
पुढच्या शेरांमधले काफिये - 'राह', 'तबाह', 'आह'
मग निदा फ़ाजलीच्या प्रख्यात गझलेचा मत्ला पण आठवलाः
'अपना ग़म लेके कहीं और न जाया जाए
घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए'
पुढच्या शेरांमधले काफिये - 'बचाया', 'सताया', 'उडाया', 'रुलाया', 'हँसाया'
मग मात्र मी www.rekhta.org आणि https://kavitakosh.org/ वर अशा गझला शोधायला सुरुवात केली आणि मला वरच्या उदाहरणां सकट १२ नामांकित शायरांच्या १८ अशा गझला सापडल्या –
• अहमद फ़राज़ – ३ गझला
• जलील मानिकपूरी – ३ गझला
• दाग़ दहेलवी – २ गझला
• अकबर इलाहाबादी – २ गझला
• मिर्ज़ा ग़ालिब – १ गझल
• वसीम बरेलवी – १ गझल
• निदा फ़ाज़ली – १ गझल
• ज़ौक – १ गझल
• जाँ निसार अख़्तर – १ गझल
• मोहम्मद अलवी – १ गझल
• सिराज लखनवी – १ गझल
• जौन एलिया – १ गझल
ही उदाहरणे पाहून मला प्रश्न पडला की हे नावाजलेले शायर काफियामधे चुका करत आहेत कि ते एखादा विशिष्ट प्रयोग करत आहेत जो आपल्याला समजत नाहीये? या प्रश्नाचे उत्तर मी आंतरजालावर शोधले तेव्हा समजले की या बाबतीत दोन मतप्रवाह आहेत-
मतप्रवाह-१:
या उदाहरणांना काफिया दोषच मानतो ज्यांचे उर्दूत वेगवेगळे प्रकार आहेत – ईता-ए-जली, ईता-ए-ख्फी, ईक्वा, ऐब-ए-शयास्त वगैरे. विविध प्रकारच्या काफियादोषांचा हा विषय जरा किचकट आणि वादग्रस्त आहे. हे ही खरे आहे की ज्यात काही वादविवाद नाही असे दोष पत्करून ही आजचे उर्दू गझलकार गझल लिहित आहेत. तर वर नोंदलेली (आणि लेखाखाली दिलेली) उदाहरणे सदोष आहेत, असे म्हटल्यास विषय इथेच संपतो.
मतप्रवाह-२:
या बाबतीत मला तुफैल चतुर्वेदी नावाच्या उर्दू शायरांकडून समजले. मला ते पटले ही म्हणून ते मत मी इथे मांडत आहे.
ही मांडणी करण्यापूर्वी मात्र काही disclaimers देणे अत्यंत आवश्यक आहे.
१) उर्दू गझलेत काफियाचा हा दोषसदृश प्रयोग खूप कमी प्रमाणात आढळतो. रेख्ताच्या गझलांच्या महासागरात ८२०८६ गझला आहेत. त्यात मला १८ उदाहरणे सापडली. माझ्या वाचनात न आलेली उदाहरणे याहून चारपट जरी असली तरी सर्व मिळून ९० उदाहरणे होतील. म्हणजेच काय तर या प्रयोगाचे प्रमाण ०.१% च्या आसपास असावे असा माझा अंदाज आहे. या नामांकित गझलकारांच्या इतक्याच प्रमाणात, किंवा अजून जास्त प्रमाणात, स्पष्ट काफिया दोष असलेल्या गझलाही सापडतात. मग इतक्या कमी प्रमाणात झालेल्या या प्रयोगाचा फारसा विचार करायची गरज आहे का असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नाचे तुमचे उत्तर 'गरज नाही' असेच असू शकते. तसे असल्यास इथेच थांबलात आणि या पुढे लेख वाचला नाही तरी चालेल. ज्यांना खरंच या ०.१% मध्ये रस आहे अशा चोखंदळ मंडळींसाठी या पुढचा लेखनप्रपंच!
२) या पुढे मी जे मांडणार आहे त्याचे फारसे लेखी संदर्भ उपलब्ध नाहीत. या विषयावरची उर्दू गझलकार तुफैल चतुर्वेदींची एक पोस्ट मला आंतरजालावर सापडली [१]. त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी मला सांगितले की अशा बऱ्याच गोष्टी उर्दू गझल परंपरेत आहेत ज्या कुठेही लिखित स्वरूपात मिळणार नाहीत. या गोष्टी ज्येष्ठ शायरांकडून नवीन शायर बैठकीत (मजलिस) शिकतात म्हणून याला 'इल्म-ए-मजलिस'असेही म्हणतात. मला जे समजले ते मला तर्कबद्ध वाटले आणि वर दिलेल्या उदाहरणांच्या बाबतीतल्या शंकांचे निरसन करणारे वाटले म्हणून ते मी इथे मांडत आहे. तर या मांडणीच्या लेखी संदर्भाची अपेक्षा करू नये.
३) विषय नाजुक आहे. यावर निर्विवादपणे काहीही सांगणे अवघड आहे. तर्क लावायला हरकत नाही पण कुतर्क आणि वितर्क केल्यास मुद्दा हातातून निसटून जाण्याची भीती आहे. तर वाचकांनी सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा आणि पटले नाही तर उगाच वाद न घालता हा विषय इथेच सोडून द्यावा, अशी कळकळीची विनंती आहे.
आता मुद्द्यावर येतो.
प्र-१: हा दोष आहे कि प्रयोग?
उः जरी काफियादोष वाटत असला तरी हा 'हुस्न-ए-ईता' (किंवा ईता हुस्न) नावाचा प्रयोग आहे
प्र-२: 'हुस्न-ए-ईता' म्हणजे काय?
उः जेव्हा मत्ल्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीतल्या काफियाची एखादे अक्षर वगळून दुसरा काफिया बनतो आणि त्या दुसऱ्या काफियाचा अर्थ पहिल्या काफियाच्या शब्दासारखा नसून वेगळाच असतो तेव्हा त्याला 'हुस्न-ए-ईता' असे म्हणतात. दोष न मानता त्याला सौंदर्यस्थान मानले आहे.
प्र-३: काय? काही समजले नाही.
उः एका उदाहरणाने हे समजता येईल. दाग़चा हा मत्ला परत बघा.
'ख़ातिर से या लिहाज़ से मैं मान तो गया
झूटी क़सम से आप का ईमान तो गया'
मत्ल्यात दोन पैकी एक काफिया आहे 'ईमान'. आता यातील 'ई' अक्षर वगळून
'मान' हा वेगळा शब्द काफिया म्हणून आला. या 'मान' चा अर्थ 'ईमान' सारखा नाही. त्यामुळे या प्रयोगाला दोष न मानता हुस्न-ए-ईता म्हटले आहे.
प्र-४: हे झाले दाग़च्या मत्ल्याचे स्पष्टीकरण. वसीम बरेलवीच्या मत्ल्यातल्या 'खुशबू' आणि 'काबू' चे काय?
उः 'खुशबू' शब्द 'खुश' आणि
'बू' या दोन शब्दांच्या संधीने बनलेला आहे. 'बू' शब्दाला स्वतःचा अर्थ आहे म्हणून त्यालाच काफिया मानला आहे. आता बघा 'काबू' आणि 'बू'असे काफिये मिळाले. आता हे देखील 'ईमान' आणि 'मान' सारखेच झालेना!
प्र-५: पण 'बू' हा काफियाचा समान भाग आल्यावर नंतरच्या शेरां मध्ये फक्त 'ऊ' जपले आहे त्याचे काय?
उः 'काबू' मधला 'बू' आणि दुसरा काफिया 'बू' ही अक्षरे जरी समान असली तरी त्यांची अर्थभिन्नता त्यांच्यातल्या 'ब' व्यंजनाच्या समानते कडे लक्ष जाऊ देत नाही. आणि म्हणून पुढच्या शेरांमधे फक्त 'ऊ' सांभाळला जातो.
प्र-६: अशी उदाहरणे अन्य भाषेच्या गझलेत आहेत का?
उः गुजरातीत विवेक काणे यांचा एक शेर आहेः
'खरे एकेक पीछुं कल्पनानुं अंततोगत्वा
उडुं छुं तो पडे छे आभ नानुं अंततोगत्वा'
'कल्पनानुं' (कल्पनेचे) आणि 'नानुं' (छोटे) मधे 'नानुं' या शब्दांशाचा अर्थ दोन्ही काफियांमधे वेगळा आहे. या गझलेत पुढे 'आनुं' आधार असलेले काफिये वापरले आहेत.
'सम्राटमां नथी अने दरवेशमां नथी
मारी मनुष्यता कोई गणवेशमां नथी'
- भगवतीकुमार शर्मा
'दरवेश' मधल्या वेश शब्दांशाला वेगळा अर्थ नाही आणि गणवेश तर 'गण'+ 'वेश' असा समास आहे आणि यात 'वेश'ला अर्थ आहे. म्हणून हा ही 'हुस्न-ए-ईता'चा प्रयोग आहे. गझलेत पुढे फक्त 'एश' आधाराचे काफिये वापरले आहेत.
तर असा आहे हा 'हुस्न-ए-ईता' चा प्रयोग. लेखात आधीच नोंदवले त्या प्रमाणे हे वादातीत नाही. बरेच उर्दू अरूझ चे जाणकार याला दोषच म्हणतात. पण मला हे सौंदर्यस्थान वाटते.
डॉ. श्रीकृष्ण राउत यांनी “गझलेचे उपयोजित छंदशास्त्र” यात काफियादोषांवर विशद चर्चा केली आहे [२]. त्या चर्चेचा उपसंहार करतांना त्यांनी केलेली विधाने या विषयाच्या संदर्भात खूप महत्त्वाची आहेत. तेच इथे उद्धृत करत लेखाचा समारोप करणे योग्य ठरेलः
'वादावादीच्या ह्या अडचणीतून मराठी गझलेला आपली वाट काढावी लागणार आहे. कालबाह्य होत आलेल्या नियमांना कट्टरतेने चिकटून रहायचे की, दोषांची अपवादात्मकता स्वीकारून गझलेतील काव्यात्मकता राखायची, हे गझल लिहिणाऱ्या प्रत्येक कवीच्या काव्यविवेकाला खरे आव्हान आहे. योग्य शब्दांची निवड करताना नियम मोडला आणि अल्पसा दोष आला, तर गुणग्राहक रसिकाप्रमाणे आपण उस्फूर्त आणि उत्तम काव्यमूल्य जपणाऱ्या गझलेच्या बाजूने उभे रहायला हवे.'
बारा शायर, अठरा गझलाः
१) अहमद फ़राज़ (https://surl.li/hemvke)
'तुझ पर भी न हो गुमान मेरा
इतना भी कहा न मान मेरा
मैं दुखते हुये दिलों का ईशा
और जिस्म लहुलुहान मेरा
कुछ रौशनी शहर को मिली तो
जलता है जले मकान मेरा
ये जात ये कायनात क्या है
तू जान मेरी जहान मेरा
जो कुछ भी हुआ यही बहुत है
तुझको भी रहा है ध्यान मेरा'
२) अहमद फ़राज़ (https://surl.li/nmkwio)
'तुझसे बिछड़ के हम भी मुकद्दर के हो गये
फिर जो भी दर मिला है उसी दर के हो गये
फिर यूँ हुआ के गैर को दिल से लगा लिया
अंदर वो नफरतें थीं के बाहर के हो गये
क्या लोग थे के जान से बढ़ कर अजीज थे
अब दिल से मेह नाम भी अक्सर के हो गये
ऐ याद-ए-यार तुझ से करें क्या शिकायतें
ऐ दर्द-ए-हिज्र हम भी तो पत्थर के हो गये
समझा रहे थे मुझ को सभी नसेहान-ए-शहर
फिर रफ्ता रफ्ता ख़ुद उसी काफिर के हो गये
अब के ना इंतेज़ार करें चारगर का हम
अब के गये तो कू-ए-सितमगर के हो गये
रोते हो एक जजीरा-ए-जाँ को 'फ़राज़' तुम
देखो तो कितने शहर समंदर के हो गये'
३) अहमद फ़राज़ (https://surl.li/anphnw)
'तुम भी ख़फा हो लोग भी बरहम हैं दोस्तों
अ़ब हो चला यकीं के बुरे हम हैं दोस्तों
किसको हमारे हाल से निस्बत हैं क्या करे
आखें तो दुश्मनों की भी पुरनम हैं दोस्तों
अपने सिवा हमारे न होने का ग़म किसे
अपनी तलाश में तो हम ही हम हैं दोस्तों
कुछ आज शाम ही से हैं दिल भी बुझा बुझा
कुछ शहर के चराग भी मद्धम हैं दोस्तों
इस शहरे आरज़ू से भी बाहर निकल चलो
अ़ब दिल की रौनकें भी कोई दम हैं दोस्तों
सब कुछ सही "फ़राज़" पर इतना ज़रूर हैं
दुनिया में ऐसे लोग बहुत कम हैं दोस्तों'
४) जलील मानिकपूरी (https://surl.lt/iycsno)
'निगाह बर्क़ नहीं चेहरा आफ़्ताब नहीं
वो आदमी है मगर देखने की ताब नहीं
गुनह गुनह न रहा इतनी बादा-नोशी की
अब एक शग़्ल है कुछ लज़्ज़त-ए-शराब नहीं
हमें तो दूर से आँखें दिखाई जाती हैं
नक़ाब लिपटी है उस पर कोई इताब नहीं
पिए बग़ैर चढ़ी रहती है हसीनों को
वहाँ शबाब है क्या कम अगर शराब नहीं
बहार देता है छन छन के नूर चेहरे का
सर-ए-नक़ाब है जो कुछ तह-ए-नक़ाब नहीं
वो अपने अक्स को आवाज़ दे के कहते हैं
तिरा जवाब तो मैं हूँ मिरा जवाब नहीं
उसे भी आप के होंटों का पड़ गया चसका
हज़ार छोड़िए छुटने की अब शराब नहीं
बुतों से पर्दा उठाने की बहस है बेकार
खुली दलील है काबा भी बे-नक़ाब नहीं
'जलील' ख़त्म न हो दौर-ए-जाम-ए-मीनाई
कि इस शराब से बढ़ कर कोई शराब नहीं'
५) जलील मानिकपूरी (https://surl.li/gffgwi)
'अब कौन फिर के जाए तिरी जल्वा-गाह से
ओ शोख़ चश्म फूँक दे बर्क़-ए-निगाह से
किस शान से चला है मिरा शहसवार-ए-हुस्न
फ़ित्ने पुकारते हैं ज़रा हट के राह से
झपकी पलक तू बर्क़ फ़लक से ज़मीं पे थी
सँभला न कोई गिर के तुम्हारी निगाह से
दिलचस्प हो गई तिरे चलने से रहगुज़र
उठ उठ के गर्द-ए-राह लिपटती है राह से
मीज़ाँ खड़ी हुई मिरे आगे न रोज़-ए-हश्र
दबना पड़ा उसे मिरे बार-ए-गुनाह से
देखो फिर ऐसे देखने वाले न पाओगे
क्यूँ ख़ाक में मिलाते हो नीची निगाह से
आईने आरसी तो फ़क़त देखने के हैं
देखो तुम अपने हुस्न को मेरी निगाह से
कसरत से मय जो पी है नज़र है मआल पर
रअशा नहीं है काँप रहा हूँ गुनाह से
पाया बुलंद क्यूँ न हमारा हो ऐ 'जलील'
पाया है फ़ैज़ अमीर-ए-सुख़न दस्तगाह से'
६) जलील मानिकपूरी (https://surl.li/xdxtqr)
'देखा जो हुस्न-ए-यार तबीअत मचल गई
आँखों का था क़ुसूर छुरी दिल पे चल गई
हम तुम मिले न थे तो जुदाई का था मलाल
अब ये मलाल है कि तमन्ना निकल गई
साक़ी तिरी शराब जो शीशे में थी पड़ी
साग़र में आ के और भी साँचे में ढल गई
दुश्मन से फिर गई निगह-ए-यार शुक्र है
इक फाँस थी कि दिल से हमारे निकल गई
पीने से कर चुका था मैं तौबा मगर 'जलील'
बादल का रंग देख के नीयत बदल गई'
७) दाग़ दहेलवी (https://surl.li/rwovyl)
'ख़ातिर से या लिहाज़ से मैं मान तो गया
झूटी क़सम से आप का ईमान तो गया
दिल ले के मुफ़्त कहते हैं कुछ काम का नहीं
उल्टी शिकायतें हुईं एहसान तो गया
डरता हूँ देख कर दिल-ए-बे-आरज़ू को मैं
सुनसान घर ये क्यूँ न हो मेहमान तो गया
क्या आए राहत आई जो कुंज-ए-मज़ार में
वो वलवला वो शौक़ वो अरमान तो गया
देखा है बुत-कदे में जो ऐ शैख़ कुछ न पूछ
ईमान की तो ये है कि ईमान तो गया
इफ़्शा-ए-राज़-ए-इश्क़ में गो ज़िल्लतें हुईं
लेकिन उसे जता तो दिया जान तो गया
गो नामा-बर से ख़ुश न हुआ पर हज़ार शुक्र
मुझ को वो मेरे नाम से पहचान तो गया
बज़्म-ए-अदू में सूरत-ए-परवाना दिल मिरा
गो रश्क से जला तिरे क़ुर्बान तो गया
होश ओ हवास ओ ताब ओ तवाँ 'दाग़' जा चुके
अब हम भी जाने वाले हैं सामान तो गया'
८) दाग़ देहलवी (https://surl.li/hpeczr)
'आफत की शोख़ियां है तुम्हारी निगाह में
मेहशर के फितने खेलते हैं जल्वा-गाह में
वो दुश्मनी से देखते हैं देखते तो हैं
मैं शाद हूँ कि हूँ तो किसी कि निगाह में..
आती है बात बात मुझे याद बार बार
कहता हूं दोड़ दोड़ के कासिद से राह में..
इस तौबा पर है नाज़ मुझे ज़ाहिद इस कदर
जो टूट कर शरीक हूँ हाल-ए-तबाह में
मुश्ताक इस अदा के बहुत दर्दमंद थे
ऐ दाग़ तुम तो बैठ गये एक आह में'
९) अकबर इलाहाबादी (https://surl.li/drhndx)
'ख़ुशी क्या हो जो मेरी बात वो बुत मान जाता है
मज़ा तो बेहद आता है मगर ईमान जाता है
बनूँ कौंसिल में स्पीकर तो रुख़्सत क़िरअत-ए-मिस्री
करूँ क्या मेम्बरी जाती है या क़ुरआन जाता है
ज़वाल-ए-जाह-ओ-दौलत में बस इतनी बात अच्छी है
कि दुनिया में बख़ूबी आदमी पहचान जाता है
नई तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं होती
मज़ाहिब रहते हैं क़ाइम फ़क़त ईमान जाता है
थिएटर रात को और दिन को यारों की ये स्पीचें
दुहाई लाट साहब की मिरा ईमान जाता है
जहाँ दिल में ये आई कुछ कहूँ वो चल दिया उठ कर
ग़ज़ब है फ़ित्ना है ज़ालिम नज़र पहचान जाता है
चुनाँ बुरूँद सब्र अज़ दिल के क़िस्से याद आते हैं
तड़प जाता हूँ ये सुन कर कि अब ईमान जाता है'
१०) अकबर इलाहाबादी (https://surl.li/sihagi)
'इक बोसा दीजिए मिरा ईमान लीजिए
गो बुत हैं आप बहर-ए-ख़ुदा मान लीजिए
दिल ले के कहते हैं तिरी ख़ातिर से ले लिया
उल्टा मुझी पे रखते हैं एहसान लीजिए
ग़ैरों को अपने हाथ से हँस कर खिला दिया
मुझ से कबीदा हो के कहा पान लीजिए
मरना क़ुबूल है मगर उल्फ़त नहीं क़ुबूल
दिल तो न दूँगा आप को मैं जान लीजिए
हाज़िर हुआ करूँगा मैं अक्सर हुज़ूर में
आज अच्छी तरह से मुझे पहचान लीजिए'
११) मिर्ज़ा ग़ालिब (https://surl.li/nikobd)
'हैराँ हूँ दिल को रोऊँ कि पीटूँ जिगर को मैं
मक़्दूर हो तो साथ रखूँ नौहागर को मैं
छोड़ा न रश्क ने कि तिरे घर का नाम लूँ
हर इक से पूछता हूँ कि जाऊँ किधर को मैं
जाना पड़ा रक़ीब के दर पर हज़ार बार
ऐ काश जानता न तिरे रह-गुज़र को मैं
है क्या जो कस के बाँधिए मेरी बला डरे
क्या जानता नहीं हूँ तुम्हारी कमर को मैं
लो वो भी कहते हैं कि ये बे-नंग-ओ-नाम है
ये जानता अगर तो लुटाता न घर को मैं
चलता हूँ थोड़ी दूर हर इक तेज़-रौ के साथ
पहचानता नहीं हूँ अभी राहबर को मैं
ख़्वाहिश को अहमक़ों ने परस्तिश दिया क़रार
क्या पूजता हूँ उस बुत-ए-बेदाद-गर को मैं
फिर बे-ख़ुदी में भूल गया राह-ए-कू-ए-यार
जाता वगर्ना एक दिन अपनी ख़बर को मैं
अपने पे कर रहा हूँ क़यास अहल-ए-दहर का
समझा हूँ दिल-पज़ीर मता-ए-हुनर को मैं
'ग़ालिब' ख़ुदा करे कि सवार-ए-समंद-नाज़
देखूँ अली बहादुर-ए-आली-गुहर को मैं'
१२) वसीम बरेलवी (https://surl.li/klhskb)
'तू भी बिखरना सीख ले, अपने जिस्म की पागल ख़ुशबू से
मै भी हुआ जाता हू बाहर, अन्देशों के क़ाबू से
मेरा कहलाने का मतलब ये तो नही, तू मेरा हो
तेरा-मेरा रिश्ता, जैसे फ़ूल का रिश्ता ख़ुशबू से
संग उठाओ संग कि देखो पत्थर है पत्थर का जवाब
किलए ढाने िनकले हो और वो भी लरज़ते आसूं से
शाहों ने भी शाही छोड के प्यार किया , तो प्यार मिला
दिल की ज़मीने जीत न पाया कोई भी ज़ोर-ए-बाज़ू से
फितरत ही आज़ाद हो जिसकी, उसका ददर्ना नही जाना
मैने तो बस, ये चाहा, अपनी मुट्ठी भर लूं ख़ुशबू से
आंखे ज़ख़्मी है, तो 'वसीम' अब शिकवा और शिकायत क्या
तुमने भी तो देखना चाहा दिनया हो हर पहलू से'
१३) निदा फ़ाज़ली (https://surl.li/dlswqi)
'अपना ग़म ले के कहीं और न जाया जाए
घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए
जिन चराग़ों को हवाओं का कोई ख़ौफ़ नहीं
उन चराग़ों को हवाओं से बचाया जाए
ख़ुद-कुशी करने की हिम्मत नहीं होती सब में
और कुछ दिन अभी औरों को सताया जाए
बाग़ में जाने के आदाब हुआ करते हैं
किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए
क्या हुआ शहर को कुछ भी तो दिखाई दे कहीं
यूँ किया जाए कभी ख़ुद को रुलाया जाए
घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए'
१४) ज़ौक (https://surl.li/ikuiqa)
'किसी बे-कस को ऐ बे-दादगर मारा तो क्या मारा
जो आप ही मर रहा हो उस को गर मारा तो क्या मारा
न मारा आप को जो ख़ाक हो इक्सीर बन जाता
अगर पारे को ऐ इक्सीर गर मारा तो क्या मारा
बड़े मूज़ी को मारा नफ़्स-ए-अम्मारा को गर मारा
नहंग ओ अज़दहा ओ शेर-ए-नर मारा तो क्या मारा
ख़ता तो दिल की थी क़ाबिल बहुत सी मार खाने के
तेरी ज़ुल्फ़ों ने मुश्कीं बाँध कर मारा तो क्या मारा
नहीं वो क़ौल का सच्चा हमेशा क़ौल दे दे कर
जो उस ने हाथ मेरे हाथ पर मारा तो क्या मारा
तुफ़ंग ओ तीर तो ज़ाहिर न था कुछ पास क़ातिल के
इलाही उस ने दिल को ताक कर मारा तो क्या मारा
हँसी के साथ याँ रोना है मिसल-ए-क़ुलक़ुल-ए-मीना
किसी ने क़हक़हा ऐ बे-ख़बर मारा तो क्या मारा
मेरे आँसू हमेशा हैं ब-रंग-ए-लाल-ए-ग़र्क़-ए-ख़ूँ
जो ग़ोता आब में तू ने गुहर मारा तो क्या मारा
जिगर दिल दोनों पहलू में हैं ज़ख़्मी उस ने क्या जाने
इधर मारा तो क्या मारा उधर मारा तो क्या मारा
गया शैतान मारा एक सजदे के न करने में
अगर लाखों बरस सजदे में सर मारा तो क्या मारा
दिल-ए-संगीन-ए-ख़ुसरव पर भी ज़र्ब ऐ कोह-कन पहुँची
अगर तीशा सर-ए-कोहसार पर मारा तो क्या मारा
दिल-ए-बद-ख़्वाह में था मारना या चश्म-ए-बद-बीं में
फ़लक पर ‘ज़ौक़’ तीर-ए-आह गर मारा तो क्या मारा'
१५) जाँ निसार अख़्तर (https://surl.li/uhsdxd)
'हमने काटी हैं तिरी याद में रातें अक्सर
दिल से गुज़री हैं सितारों की बरातें अक्सर
और तो कौन है जो मुझको तसल्ली देता
हाथ रख देती हैं दिल पर तिरी बातें अक्सर
हुस्न शाइस्ता-ए-तहज़ीब-ए-अलम है शायद
ग़मज़दा लगती हैं क्यों चाँदनी रातें अक्सर
हाल कहना है किसी से तो मुख़ातिब हो कोई
कितनी दिलचस्प, हुआ करती हैं बातें अक्सर
इश्क़ रहज़न न सही, इश्क़ के हाथों फिर भी
हमने लुटती हुई देखी हैं बरातें अक्सर
हम से इक बार भी जीता है न जीतेगा कोई
वो तो हम जान के खा लेते हैं मातें अक्सर
उनसे पूछो कभी चेहरे भी पढ़े हैं तुमने
जो किताबों की किया करते हैं बातें अक्सर
हमने उन तुन्द हवाओं में जलाये हैं चिराग़
जिन हवाओं ने उलट दी हैं बिसातें अक्सर'
१६) मोहम्मद अलवी (https://surl.li/corkdp)
'कोई बैंड बाजा सा कानों में था
अजब शोर ऊँचे मकानों में था.
पड़ा था मैं इक पेड़ की छाँव में
लगी आँख तो आसमानों में था.
बरहना भटकता था सड़कों पे मैं
लिबास एक से इक दुकानों में था.
नज़र मेरे चेहरे पे मरकूज़ थी
ध्यान उस का टेबल के ख़ानों में था.
ज़मीं छोड़ने का अनोखा मज़ा
कबूतर की ऊँची उड़ानों में था.
मुझे मार के वो भी रोता रहा
तो क्या वो मेरे मेहर-बानों में था'
१७) सिराज लखनवी (https://surl.li/akruih)
'बे-समझे-बूझे मोहब्बत की इक काफ़िर ने ईमान लिया
अब आठ आठ आँसू रोते हैं क्यूँ दिल का कहना मान लिया
हम फ़िक्र में थे छुप कर देखें उन जल्वों ने पहचान लिया
जब तक ये नज़र उट्ठे उट्ठे ज़ालिम ने पर्दा तान लिया
क्यूँ हुस्न-ए-गराँ-माया ये क्या तेरे जल्वे इतने अर्ज़ां
एक एक ख़ुदा अपना अपना जिस ने जिसे चाहा मान लिया
जिस पर सदक़े दोनों आलम उस अश्क की क़ीमत क्या कहिए
पलकों पर अपनी तोल चुके दामन में किसी के छान लिया
ये कोह-ए-गिराँ हिलते हैं कहीं और फिर मज़बूत इरादों के
पत्थर की लकीर है ऐ नासेह जो हम ने दिल में ठान लिया
जल्वा कि फ़रेब-ए-जल्वा था जो हो तस्वीर मुकम्मल थी
इक शोर उठा हर जानिब से पहचान लिया पहचान लिया
मुझ से तो किसी से बैर न था दुनिया मिरे ख़ून की प्यासी है
मक़्तल की तरफ़ से जो गुज़रा इक हाथ लहू में सान लिया
होंटों पे बनावट की वो हँसी फ़रियाद का आलम साँसों में
ज़ालिम की मोहब्बत छुप न सकी जिस ने देखा पहचान लिया
बरसों उलझे अरबाब-ए-ख़िरद ये एक गिरह अब तक न खुली
सर आप ही झुक गए सज्दे में घबरा के ख़ुदा को मान लिया
मरना हो 'सिराज' कि जीना हो बे-मिन्नत-ए-ग़ैर हो जो कुछ हो
क्या रह गई ख़ंजर-ए-क़ातिल का गर्दन पे अगर एहसान लिया'
१८) जौन एलिया (https://surl.li/dumrxj)
'ऐश-ए-उम्मीद ही से ख़तरा है
दिल को अब दिल-दही से ख़तरा है
है कुछ ऐसा कि उस की जल्वत में
हमें अपनी कमी से ख़तरा है
जिस के आग़ोश का हूँ दीवाना
उस के आग़ोश ही से ख़तरा है
याद की धूप तो है रोज़ की बात
हाँ मुझे चाँदनी से ख़तरा है
है अजब कुछ मुआ'मला दरपेश
अक़्ल को आगही से ख़तरा है
शहर-ए-ग़द्दार जान ले कि तुझे
एक अमरोहवी से ख़तरा है
है अजब तौर हालत-ए-गिर्या
कि मिज़ा को नमी से ख़तरा है
हाल ख़ुश लखनऊ का दिल्ली का
बस उन्हें 'मुसहफ़ी' से ख़तरा है
आसमानों में है ख़ुदा तन्हा
और हर आदमी से ख़तरा है
मैं कहूँ किस तरह ये बात उस से
तुझ को जानम मुझी से ख़तरा है
आज भी ऐ कनार-ए-बान मुझे
तेरी इक साँवली से ख़तरा है
उन लबों का लहू न पी जाऊँ
अपनी तिश्ना-लबी से ख़तरा है
'जौन' ही तो है 'जौन' के दरपय
'मीर' को 'मीर' ही से ख़तरा है
अब नहीं कोई बात ख़तरे की
अब सभी को सभी से ख़तरा है'
संदर्भसूचीः
[१] तरही-14/12 मतले में ईता की ख़ामी पर स्पष्टीकरण https://surl.li/rbwuig
[२] 'गझलेचे उपयोजित छंदशास्त्र' - डॉ. श्रीकृष्ण राऊत, स्वयं प्रकाशन, पुणे, २०२५
______________________________________________

No comments:
Post a Comment